अरेरे काय् हे आपल्याच पायावर डोंगराएवढा धोंडा पाडून घेणारा हा धीरजदगडच असावा खरे आहे दगडच आहे तो मित्रानो साधासुधा नव्हे मैलाचा दगड.अहिक सुखाचे मार्ग न शोधता खऱ्या सुखाचे मार्ग चोखाळणारा एक देवव्रत,आदिवासी इलाख्यात जाऊन तिथल्या मुलांना शिकवणारा ,माणूस बनवणाराएक देव्व्रती शिक्षक .धीरज शहापूरपासून कित्येक मैलांवर असलेल्या"बेलवली"नावाच्या गावात प्राथमिक शाळेत शिकवतो ,आदिवासी पाड्यातचालवल्या गेलेल्या शाळेत आणि शासनाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या शाळेतकिती तफावत असते हे वेगळे सांगायची जरूरच नाही ,पण सत्यातल्या शाळाशासकीय जाहिरातीतातल्याच नव्हे तर त्याहूनही चांगल्या बनवण्याचा चंगचजणू त्याने बांधला आहे ,ग्रामीण भागात शाळा शिकवण्याला शाळा हाकणेअसाही एक समानार्थी शब्द वापरला जातो सरकारी शाळांना चराऊ कुरणसमजणारे काही पुण्यवंत शिकवण्याचा जोड धंदा करत करत ,आर्दश शिक्षकम्हणून प्रमाण पत्रके मिळवतात आणि बाकी आयुष्य त्यावर मिळणाऱ्यालाभांवर सुखनैव घालवतात.पण धीरज कुठल्या मातीचा बनला आहेपरमेश्वरच जाणे,हा डोंगरा एवढा माणूस अक्षरशः माणसे घडवतोय , सर्वसामान्य मुलांना मिळणाऱ्या प्राथमिक सोईपासुनही वंचित असलेल्याआदिवासि मुलाना माणसात आणतोय , शिक्षणाचे महत्व काय आहे हे तरशिकवतो आहेच पण त्याहून जिकीरीचे काम म्हणजे त्यांच्या पालकांनात्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाचे महत्वही पटवतो आहे ,आणि एवढे करूनहीत्याचे वेतन एकाच मिळत असावे हाची मला खात्री आहे ते वेळेवर मिळते किनाही ह्याची मात्र खात्री नाही. धीरजच्या शब्दात सांगायचे झाले तर त्याचेविद्यार्थी कित्येक पटीने ती परत फेड करतात त्यांचा होणारा उत्कर्ष त्यांनीत्याच्यवर टाकलेला एक विश्वास आणि त्यांचा खडतर आयुष्यात धीरज मुळेउमटणारी "एखाधीच का होईना" स्मित रेषा, ह्या परताव्यावरती मला आभाळाएवढे सुख मिळते ..सुखाची तुम्हाम्हला न कळणारी हि एक वेगळीच परिभाषा,पण ती कळणारी एक संस्था ठाण्यात ठाण मांडून उभी आहे ,कित्येकसेवाभावी आणि पर्यटन प्रेमी युवकांची एक संस्था "दुर्ग सखा"दर्या डोंगरातफिरणारी आणि" मानवते एक एक पाऊल टाकणारी एक संस्था ,धीरजच्याआठवणीला पुण्यस्मरण म्हणावसे वाटते जिवंत व्यक्तीच्या स्मरणाला पुण्यशब्दाचे अमरत्व प्राप्त तेव्हाच होते जेव्हा ओठांवर शब्द येतात ,गुरुर ब्रम्हागुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर ,गुरुर साक्षात परब्रम्ह तस्म्ये गुरवे नमः '
मास्तरला गुरुपद प्राप्त करून देण्याला माझ्या ह्या मित्राला माझे सादर प्रणाम
माझ्या मैत्रायाणातला हा एक गुरु चारित्री अद्ध्याय
संदर्भ:http://mitrancheramayan.blogspot.in/2014/11/blog-post_5.html
लेखक : शशांक रांगणेकर