३/०५/२०१५

फाटकांचा प्रसादमाझे स्नेही माधव फाटक ह्यांचा पुतण्या चि. प्रसाद फाटक ह्याची मुलाखत शनवार दिनांक १३.१२ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वर प्रसारित झाली ,फार आनंद झाला
फाटक सरांची आणि माझी ओळख काही फार जुनी आहे अशातली गोष्ट नाही पण माणसाच्या आयुष्यात कधी कधी चमत्कार घडतात आणि मैत्रीचे बंध नकळत जुळतात ,आणि इथे तर मैत्री व्यक्ती शी नव्हती तर संपूर्ण घराशी जुळली होती ,मालिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर फाटक परिवाराशी मैत्री जुळली आणि बंध अतूट झाले .एक घरच माझे झाले होते आणि माधव चे मित्र हि ओळख पुसट होऊन पप्पा हे नामांकन कधी पक्के झाले ते कळले पण नाही .विले पार्ले येथील तेजपाल स्कीम येथे राहणाऱ्या फाटक मंडळींशी माझी मैत्री हा एक ईश्वरीय संकेतच नव्हे तर प्रसादच आहे असा माझा धृढ विश्वास आहे.

सामान्य दिसणारा माणूस किती असामान्य असतो ह्याचे उत्तर फाटक परिवाराशी ओळख झाल्यावाचून कळत नाही,बहुश्रुत असूनही ज्ञानाचा गर्व नाही ,पांडित्य असूनही विचारांची जडता नाही आर्थिक सुस्तिथी असूनही झगमगत्या खोट्या दिव्यांची रोषणाई नाही देवघरातल्या नंदादीपाची आणि मनाच्या गाभाऱ्यात उजळणार ज्ञान दीपाची सारखीच काळजी घेणारे एक सुसंकृत घर अशी घरे फक्त घरे नसतात तर संकुले असतात ,संस्कृती ,शालीनता ऋजुता अभ्यास बहुश्रुतता अश्या अनेक सद्गुणाचे टोप पदरी पैठणीचे महावस्त्र लेऊन हि घरे खऱ्या अर्थाने समाजाची नियत सांभाळतात,सामाजिक संस्कृती खऱ्या अर्थाने हि घरे रुजवतात .
समाजातल्या सर्व विचारांच्या संतुलनाचे बहु मुल्य काम हि घरे करत असतात आणि अश्या घरांमुळे सामाजिक संतुलन शाबूत राहते.
फाटक परिवारातल्या श्री विनायक दादा आणि सौ सुनंदाताई उर्फ बाई ह्यांचे चिरंजीव प्रसाद ,वडिलांची खेळाडू शिस्तप्रिय वृत्ती आणि आईचा गाता गळाआणि घराण्याकडून वारसा हक्काने आलेले अनेक सद्गुण घेऊनच जन्माला आला आहे.मराठी भाषेत एक म्हण प्रचलित आहे "खाण तशी माती आणि माय तशी पुति ",तुकाराम बुवा सांगून गेले आहेत "शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी .माता पित्यांचे सर्व सदगुण पुत्रात आढळतातच असे नाही किंबहुना पाहिया पिढीत सद्गुण वापरले गेल्याने पुढच्या पिढीच्या वाट्याला ते येत हि नाहीत म्हणूनच "आई वडील किती चांगले होते नाही तर हा ? असे खेदोद्गार बऱ्याच वेळेला ऐकू येतात ,पण प्रसाद च्या बाबतीत मात्र आई वडिलांनाच नव्हे तर सर्व प्रियजनांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी फडके झेंडा "असे वाटते . फाटक परिवाराला दैवाने किवा देवाने किव्हा दोघांनी एकत्र येऊन एक उजव्या हातानी एक दान दिले आहे ते म्हणजे त्यांची पुढची पिढी . प्रसाद ,अमोल ,अमोघ आणि समीर फाटकांची पुढची पिढी प्रसाद ह्यातील सर्वात जेष्ठ . सर्व भावंडे एकोप्याने आणि एकजुटीने वागून घराला घर पण कसे देतात ह्याचे उत्तम उदाहरण प्रत्येक मराठी घराने ह्यापासून जरूर बोध घ्यावा .
प्रसाद हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तो उत्तम खेळाडू आहे ,उत्तम तंत्रज्ञान विभूषित अभियंता आहे ,उत्तम गझलकार आहे ,चपळ खेळाडू आहे ,प्रशासक आहे ,पार्ल्याहून चर्चगेट ला जाऊन यावे इतक्या सहजपणे जगप्रवास करणारा उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा विक्रेताही आहे खनिज उत्खननासाठी लागणाऱ्या यंत्राचे दिसिनिंग हि ह्याची खासियत आहे आणि ह्या क्षेत्रातला आतारास्त्रीया दर्जाजाचा विशेषज्ञ म्हणून भारतातच नव्हे तर जगभर प्रख्यात आहे. कोळशाच्या खाणींवर एक विशेषज्ञ म्हणून हा प्रख्यात आहे . कोळश्याच्या खाणीचे काम करूनही हात स्वच्छ असलेला माणूस मिळणे विरळा .

कलावंत अनेक असतात कलेच्या क्षेत्रात बहुमानाचे अनेक योग त्यांच्या आयुष्यात येतात पण मी कोणासाठी काहीतरी केले आहे असे समाधानाचे क्षण कधीतरीच त्यांच्या आयुष्यात येतातप्रसाद हा केवळ उत्तम कलावंतच नाही तर माणुसकीचा चेहरा बाळगणारा कलावंत आहे ,स्त्रियांच्या प्रश्नांवर समाज प्रबोधन करावे म्हणून त्यांनी काही कार्यक्रमांची आखणीही तो करतो आहे.

प्रसाद उत्तम गायक आणि कवी हि आहे ,त्याचे दोन आल्बम प्रसारित होताहेत ,नवोदित गायकांना वादकांना संधी देण्याचे एक महत कार्य प्रसाद करतो आहे .त्य आल्बमच्या अनुषंगाने दूरदर्शनवर त्याची मुलाखत प्रसारित झाली होती ,त्या मुलाखती वरून प्रसादच्या गुणांचे तुल्यामापन करणे चुकीचे ठरेल ,त्याच्या गुणाच्या वर्णनाला `` शब्दांचे मोजमाप केवळ अपुरेच ठरेल ,जिथे शब्द थकतात तिथे भाव कामी येतात ,त्याची अनेक रूपे अनेकांना ज्ञात आहेत पण मला मात्र ज्ञात आहे "फाटकांचा प्रसाद"म्हणूनच .


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :शशांक रांगणेकर
shashank.rannganekar@gmail.com
http://mitrancheramayan.blogspot.in/

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search