महाराजांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सैन्यभरती करण्याची प्रक्रिया वाढती ठेवली.अर्थात जेवढा राज्यविस्तार होत गेला तशी सैन्याची गरज वाढणं महत्वाचे होते.परंतु त्या पूर्वी सगळेच राजे लोकांना ज्या नोकरया दयायचे त्या कंत्राटी स्वरूपाच्या किंवा हंगामी स्वरूपाच्या असायच्या.महाराजांनी ही पध्दत बदलली आणि तैनाती फौज म्हणजे कायम स्वरूपी खडे सैन्य उभं केले.
महाराजांच्या सैन्यात भरती होणं म्हणजे कायम नोकरीची हमी होती आणि म्हणूनच फक्त मराठी लोकच नाही तर इंग्रज ,कन्नाडी ,भिल्ल,लमाण,गौंड,गुजराथी लोकांनी महाराजांच्या पदरी नोकरी केली.कायम नोकरी हा घटक महाराजांनी एवढ्या प्रभावीप्रणे वापरला की विजापुरची नोकरी सोडून ७०० पठाण आले.यामुळे तर उभ्या आयुष्यात एकही माणूस महाराजांची चाकरी सोडून गेला नाही.कायम नोकरी बदल्यात रयतेने स्वराज्याला कायम निष्ठा अर्पण केली.महाराजांनी १६४५ पासून सैन्यभरती केली आणि राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांचे म्हणजे १६७४ साली जवळपास २,५०,००० खडे सैन्य होते.
संदर्भ: https://www.facebook.com/Amhichtevede
लेखक : anonymous