३/१५/२०१५

स्वराज्यस्वराज्य स्थापनेत शिवरायांना साथ मिळाली ते कधीही मागे न हटणाऱ्या मावळ्यांची. मावळ्यांबरोबरच शिवरायांना साथ दिली गड-किल्ल्यांनी. ते बोलू शकत नसले तरी शिवरायांप्रती त्यांची निष्ठा मावळ्यांइतकीच होती. शिवकालात बचाव व चढाईसाठी अत्यंत उपयुक्त हे गडकोट पाहिले की अंगात उत्साह संचारतो.

या बुलंद किल्ल्यांच्या साथीने मूठभर मराठा सैनिकांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य आणि पाताळयंत्री बादशहाला झुंज दिली. 1818च्या इंग्रज-मराठा युद्धापर्यंत या किल्ल्यांचा उपयोग झाला.

अनेक निर्णायक युद्धांत किल्ल्यांवर शिबंदीने निकराची झुंज दिली. सातवाहन, शिलाहार, यादव अशा पराक्रमी व कीर्तिवंत घराण्यांनी या किल्ल्यांवर वास्तव्य केले. शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखले, त्यांच्या आधारेच राज्यकारभार केला आणि नवे किल्ले बांधले.


शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि रायगडावर त्यांनी चिरविश्रांती घेतली. एखाद्या राजाचा गडावरच जन्म आणि मृत्यू झाल्याची ही इतिहासातील कदाचित एकमेव घटना असावी.
संदर्भ:https://www.facebook.com/Amhichtevede 
लेखक : anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search