३/१६/२०१५

शेतकर्याचं मरणविदेश दौरे करून शेजारच्या देशांशी संबंध सुधारले...
पण आपल्या दुष्काळी भागात दौरा करायला विसरले...
नेपाळला चार हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली....
पण पीडित शेतकऱ्याला मदत करण्याची आठवण नाही राहिली....

अच्छे दिन आले...
केंद्रात कमळ फुलले...
मोदी सत्तेत आले...
शेतकरी भिकेला लावले...
फडणवीस सत्तेवर आले....
दूधवाले भिकेला लावले...

शपथविधी ला दोनशे कोटी रुपयांचा चुराडा केला....
शेतकरीवर्गाला मदत करायला मात्र कर्जाचा डोंगर दिसला...
हेलिकॉप्टरमधे फिरून मंत्र्यांला दुष्काळ दौरा करायला सुचला...
मात्र काळ्या मातीतला कसणारा शेतकरी नाही दिसला...
मोबाईलला रिचार्ज करता मग लाइट बिल भरा म्हणत नाथाला साक्षात्कार झाला....
मात्र ‪आत्महत्या‬ का होतात याचा अर्थ मंत्र्यांला नाही उमजला...
नाथा पुरे आता देवेंद्र नागपूर हून ओरडला...
पण दुष्काळ जाहीर करायला मात्र मुका झाला....

असं ह्यांच एकच धोरण...
शेतकर्याचं मरण.....शेतकर्याचं मरण...


संदर्भ: www.facebook.com/mrugajalmedia
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search