३/१३/२०१५

डोळ्यां मधले डोळे जेव्हा रडले थोडे


डोळ्यां मधले डोळे जेव्हा रडले थोडे थोडे
आठवणीचे हुंदके माझे अडले थोडे थोडे
चार दिसांचे जीवन माझे चार दिसांचे रडणे
प्रेमभंग अन हृदय अश्रू पडले थोडे थोडे
चेह~यावर्ती मिश्कीलवाने भाव न होते जेव्हा
रस्त्यावर्ती खड्डे असता धडपडले थोडे थोडे
जरा चुकीचा जरा बरोबर प्रवास होता माझा
एक सखी ती सोडून जाते घडले थोडे थोडे
पाण्यामधला मासाजेव्हां पाण्या बाहेर येतो
हृदयामधले काही अश्रू तडफडले थोडे थोडे
पुन्हा मनाने बाजी मारून सावरले होते थोडे
पुन्हा कुणाच्या रुपाला पाहून गडगडले थोडे थोडे

संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search