३/१६/२०१५

पाउस आणि तू...




तुझा पिक(चित्र)पाहून पवसातल... 
दाटुन आले मेघ अंतरी... 
ह्रुदयात माझ्या प्रेमाचा पाउस... 
तू जवळ नाहीस तरी... 

तुला पावसात भिजताना पाहून
मलाही वाटल पावसात भिजाव
ओल्यचिम्ब शहारलेल्या तुला
हळूच उबदार मिठीत घ्याव

वाटते पाउस असाच पडवा
सर्वत्र प्रेमाचा गारठा वाढावा
सुकलेल्या ह्रुदयातुंन माझ्या
तुझ्या प्रेमाचा अंकुर फुटावा

पाउस पडतोय
गारवा वाढतोय
प्रत्येक सरीत
तुलाच पाहतोय

बोल न काहीतरी
साद तर दे
तुझ्याच माझ्या मनाला
दाद तर दे
नाती संपली तरी
प्रेम संपत नाही
जीवनभर साठी नाही
पावसासारखी साथ तर दे
पावसासारखी साथ तर दे

पहिल्या पावसात तरी रागाउ नकोस
नंतर जीवनात वादळच येतील
मी असेंन नसेंन तुझ्या सोबत
ह्रुदयात तुझ्या आठवणीच राहतील

कस सुचत इतक पटकन 
हे एक कोडच आहे
तू माझ्यासोबत असलीस की
वाटत तुझ वेडच आहे

आज वेड लागलेय मला तुझ 
पण तू मात्र माझ्यात नाहीस
वाटते सर्व सोडून तिकडे याव
जरी तु नशिबात नाहीस

तुला अस पावसात भिजताना पाहून
मनाला वेड लागलेय तुझे
वाटते कधी येइल तो क्षण 
जेव्हा तुझे ह्रदय होइल माझे

टप टप पडणारे पावसाचे थेम्ब
मनाला वेड लावून जातात
नेहमीच आठवतो ते क्षण
जे फ़क्त आठवणींतच राहतात

आता कविता येत नाहीत
चारोळ्याच सुचतात
तुझा विषय निघाला की
शब्दच पावसासारखे बरसतात

तुला येते का माझी आठवण
जशी मला तुझी येते
डोळे काहीतरी सांगणार इतक्यात
सरच सांगुन जाते



संदर्भ:Facebook share
लेखक : अंकुश


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search