३/१८/२०१५

|| संसारी लोणचे ||

संसारी लोणच्याच्या फोडी आधी
करकरीत असतात,
नंतर कुरकुरत का होईना हळूहळू
मुरतात.


हे लोणचं बाजारात मिळत नाही
कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं
त्याशिवाय जगण्याला चव येत नाही.

कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच
वापरावी
स्वत:च्या हातांनी कशाला लोणच्याची चव घालवावी ?

जीभेने तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो
लोणच्याचा झणझणीतपणा त्यांन
जरा कमी होतो.

"मी" पणाची मोहरी जास्त झाली तर
खार कोरडा होतो
इतरांच्या आपुलकीचा रस त्यात
उगाच शोषला जातो.

रागाचा उग्र हिंग तसा तितकासा
बाधत नाही,
लवकर शांत झाला तर लोणच्याची
चव बिघडत नाही.

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग
आणते,
विकारांच्या बुरशीपासुन संरक्षण ही
करते.

समृध्दीचं तेल असलं की काळजीचं
कारण नसतं..
त्या थराखाली लोणचं बरचसं
सुरक्षित असतं.

लोणचं न मुरताच नासावं तसं काही
संसारांच होतं,
सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुदा
कमी पडलेलं असतं....!

संदर्भ: facebook share
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search