३/२०/२०१५

सांगायचे तिला मी कित्येक प्रयत्न केले.


सांगायचे तिला मी कित्येक प्रयत्न केले..
पण ती समोर येता सारेच व्यर्थ गेले..

मग मला ते मुक्याने समजावता ना आले..

तिला भाव माझे ते जाणता ना आले..

मग सांगण्या तिला मी एक पत्र लिहिले..
त्यात सारे प्रेम जागून रात्र लिहिले..
अक्षरात प्रेम मला रचता ना आले..
तिला कोरे पत्र माझे वाचता ना आले..
मग सांगण्या तिला चित्र मी काढले..
एक तिचे माझे मी चित्र रेखाटले..
पण त्यात प्रेम रंग मला भरता ना आले..
बेरंग त्याचे अर्थ तिला लावता ना आले..
सांगावया तिला कविता मी केली..
स्तुतीमध्ये तिच्या काही लिहिल्या मी ओळी..
तिला मला उपमा त्यात देता ना आली..
तिला माझी कविता ती समजता ना आली..
सांगू तरी कसा आता प्रश्न असा पडला..
कळला भाव जगाला पण तिला तो ना कळला..
मग तिलाच का प्रेम माझे समजता ना आले..
कि मला तिला ते समजावता ना आले..


संदर्भ: facebook share
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search