बघना किती दुर्मिळ आहे आपल नात...
अस नात लाखात एखाद बघायला भेटत...
आपल नात जणु अस आहे जसे
समुद्राच्या लाटांच आणि किनाऱ्याचे
जस असत ना तस आहे आपल नात...
एकमेकांच्या एवढ्या जवळ असून
आयुष्यभर समुद्राच्या लाटा किनाऱ्याच्या
मिठीत सामवन्याचा प्रयन्त करतात पण
शेवटी निसर्गाच्या समोर अपयशच
पदरी पडत त्यांच्या..
किनारा सुधा आयुष्यभर स्वताच्या
मिठीत समुद्राला सामाउन घेण्याचा
प्रयत्न करतो पन अपयशिच ठरतो...
तसच तर आहे ना आपले नाते...
एवढ एकमेकांच्या जवळ असून
सुद्धा या समजामुळे तुला
मी माझ्या प्रेमाचा
सहवास नाही देऊ शकत..
तुला सुद्धा याच परीस्तितितुन
जाव लागत आहे याची मला
जाणीव आहे ..
तरी तुझ्यासाठीच माझ प्रेम
तेवढच दुर्मिळ राहिल
जेवढ समुद्राच्या लाटांच आणि
त्याच्या किनाऱ्याच आहे...
काळजी नको करूस आपल
प्रेम अमर राहिल....