तुझ्या चेहऱ्याचा चंद्र माझ लक्ष वेधी
पाहून तुझी सखे राहणी साधीसुधी
तुझ्या प्रेमात पडलो होतो मी कधी
तुझ्याच विचारात असे माझी समाधी
आठवण काढत जा माझी तू कधीकधी
उचकीही लागली नाही सईत तुला साधी
तुझा डोळा ओला पण नाही झाला कधी
मला खरच हे कळायला हवे होते आधी
मला कल्पनाही नाही येऊ दिलीस कधी
उगाच लागलो ग प्रिये तुझ्या नादी
मला वाटले नव्हते धोका देशील कधी
माझ्या हळव्या मनास देशील तू व्याधी …
संदर्भ: Facebook share
लेखक : सतीश मुरकुटे
९७६३०७६७२५