रात्रभर पावसाची
टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...
तीच छत्री काढुन मी उंघड बंद केली
तु सुध्दा रेनकोटची घडी उगा विस्कटली
वॉलेट फाटकं मी पुन्हा पुन्हा कुरवाळलं
सुकल्या गजरयातीलं फुल, तु ही गोंजारलं
थेबां सोबत मी अश्रुंना मोकळी वाट दिली
अस्पष्ट हुंदक्यांनी त्यानां तु पण साथ केली
रात्रभर पावसाची
टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळया करीत होतो...
रात्रभर बरयाच आठवणी गोळा झाल्या
रात्रभर सा-या पाण्यात सोडीत होतो
रात्रभर थेंबन् थेंब अंगी घेउन भिजलो
रात्रभर गात्र गात्र चिंब करीत होतो
रात्रभर शुष्क नात्यांना ओलावित होतो
रात्रभर पावसाची
टिपटीप सुरू होती...
मी आठवणीं, मोकळ्या करीत होतो...
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous