थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.

धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,

थोडा break हवाय यार.
किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.
ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसं सुख हवंय.....
घास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ
कुठंय.
आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.
future च्या plans मुळे
present वरच पडलंय पाणी...
ambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी.
home loan फेडता फेडता
Home मधेच alone झालोय.....
corporate targets पूर्ण करून emotionless
zone झालोय.
before fifty सर्व पार करायचय distance is so
far.
थोडा break हवाय यार.
कळलंच नाही कधी पाऊस गेला
कधी थंडी आली
आणि काय काय झाले बदल.....
कळलंच
नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ...
गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच
ओळखता येत नाही....
तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत
नाही.
कळत नाही कधी
झालो इतका परका....
smile च्या formality मुळे प्रत्येकजण,
दिसतो एक सारखा.
हा status,
कि space सबकुच वाटतेय बेकार....
खरंच थोडा break हवाय यार...
थोडा break हवाय ...

संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita