सुख दुखात
जवळ असावी मैत्री
मला तुझी
तुला माझी असावी खात्री ..!!
जन्माला येतो तेव्हा
नात्याचे जाळे तयार असते
तरी प्रत्येक जण जीवनात
खऱ्या मैत्रीच्या शोधात असते ..!!
मैत्री"शब्द उच्चारताच
आपलेपणाची जाणीव होते
मनही मग दुख पेलला
हसत-हसत तयारहोते ..!!
गरज नसते पुराव्याची
जेथे मैत्रीचा विश्वास असतो
मैत्रीच्या या नात्याला
समजूतदारपणा हवा असतो ..!!
इतर नात्यापेक्षा
हे नाते काहीतरी वेगळे असत
या नात्यात एक
गुप्त धन लपलेले असते ..!!
न बोलता मनातील वेदना
एकमेकांना कळत असतात
न कळत डोळ्यात
त्या पाणी भरत असतात..!!
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous