३/१७/२०१५

शब्द


शब्दांनाही पाहीलय कधितरी हट्टी होतांना,
खुपकाही बोलायच असुन अबोल राहतांना,

शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी;संदर्भ: Facebook share
लेखक :देविदास पवारWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search