३/२४/२०१५

म्हाडाची ९८९ घरांसाठी लॉटरीआता मुंबईतील ९८९ सदनिकांची लॉटरी येत्या ३१ मे रोजी निघणार आहे. यात सर्वाधिक किंमतीच्या सदनिका या मुलुंडच्या गव्हाणपाडा (मध्यम उत्पन्न गट-एमआयजी, ४७८ चौरस फूट कार्पेट) येथील आहेत. या सदनिकेची किंमत ५९ लाख ९४२ रुपये असेल, अशी मिळाली आहे.

यंदाची लॉटरी सुद्धा ३१ मे या दिवशीच निघणार असून, त्याची जाहिरात ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. म्हाडाचे तेच नियोजन कायम असून,जाहिरातीसाठी हालचाली सुरू आहेत.

यंदाच्या मुंबईतील लॉटरीत ७८५ घरे असतील, असे म्हाडाने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, म्हाडाच्या लौकिकाच्या दृष्टीने हा आकडा खूपच कमी असल्याने घरांची संख्या वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे २०४ घरांची भर पडली आहे. मुंबईतील सहा ठिकाणच्या प्रकल्पांतील घरांच्या किंमतीही म्हाडाने निश्चित केल्या आहेत.

प्रकल्पाचे ठिकाण उत्पन्न गट एकूण घरे क्षेत्रफळ (कार्पेट) किंमत (लाखांत)

गव्हाणपाडा (मुलुंड) एमआयजी १८५ ४७८ चौ. फू ५९,००,९४२ रुपये

प्रतीक्षा नगर (सायन) एमआयजी ५६ ४३६ चौ. फू. ३७,५३,६४० रुपये

उन्नत नगर (गोरेगाव) एलआयजी १८२ ३०२ चौ. फू. २७,९९,८५० रुपये

मानखुर्द इडब्ल्यूएस ६६ ३०५ चौ. फू. २५,७८,१०० रुपये

उन्नत नगर (गोरेगाव) इडब्ल्यूएस ९४ २६९ चौ. फू. २०,८३,१५० रुपये

मालवणी (मालाड) एलआयजी २३२ २९९ चौ. फू. २०,३४,६०१ रुपये

गव्हाणपाडा (मुलुंड) इडब्ल्यूएस १७४ अद्याप निश्चित झालेले नाही.संदर्भ: zee news
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search