३/२९/२०१५

मायक्रोसॉफ्टचा सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्चआपल्या दमदार ऑपरेटिंग सिस्टमसाठी जगभरात ओळखली जाणारी सर्वात मोठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्टने आपला सर्वात स्वस्त इंटरनेट फोन लॉन्च केलाय. नोकिया 215 ड्यूअल सिम भारतात आज लॉन्च झाला.

इतक्या कमी किमतीचा हा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात फेसबुक 9 स्थानिक भाषांमध्ये वापरता येण्याचं ऑप्शन देईल. या फोनमध्ये फेसबुक मॅसेंजर अॅप आधीपासूनच इंस्टॉल आहे.

नोकिया इंडिया सेल्सचे मार्केटिंग डायरेक्टर रघुवेश सरूप यांनी फोनबद्दल अधिक माहिती देतांना सांगितलं, 'भारत मोबाईल फर्स्ट मार्केट आहे आणि इंटरनेटवर एक्सेससाठी फीचर फोन्सवर मोठ्या संख्येनं मोबाइल फोन यूजर्स अवलंबून आबेत. मायक्रोसॉफ्ट पहिल्यांदा मोबाइल फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फोन आणण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यातून आम्ही उत्तम टेक्नॉलॉजी देऊ.'

यात आपल्याला 30+ ऑपरेटिंग सिस्टमसोबतच VGA कॅमेराही मिळेल. या स्मार्टफोनची किंमत 2,149 रुपये आहे.


संदर्भ: zeenews
लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search