३/२५/२०१५

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर यंदा पुन्हा एकदा मराठीने मोहोर उमटविली असून, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 'किल्ला' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.अभिनेत्री कंगना राणावत हिला 'क्वीन' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कन्नड अभिनेते विजय यांना 'नानू अवन्नला अवळू' या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.संदर्भ: Loksatta facebook page
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search