५० टक्के गरोदर महिलांना गरोदरपणात किंवा प्रसुतीनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पाठदुखीला सामोरे जावे लागते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना हा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत सहन करावा लागतो.

गरोदर असताना त्या स्त्रीसाठी पाठदुखीवरील उपचार उपलब्ध नसतात कारण विकसित होणाऱ्या गर्भावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

काही उपचार सुरक्षित असले तरी ज्या कारणामुळे पाठदुखी उद्‌भवली आहे, त्यावर ही औषधे उपचार करत नाहीत, जोपर्यंत शरीर या दुखण्यावर मात करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत केवळ वरवरच्या लक्षणांवर उपचार करतात.

गरोदरपणात पाठदुखी उद्‌भवण्याची कारणे
जगभरात झालेल्या पाहणीनुसार गरोदरपणीतील पाठदुखीचे प्रमाण हे २५ ते ९० टक्के इतके असते. त्यापैकी ५० टक्के महिलांना पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे सहन करावे लागते.

डॉक्टरांच्या मते महिला आपल्या पहिल्या प्रसूतीच्या वेळी पाठीच्या खालच्या भागातील दुखण्याला सामोऱ्या जातात. साधारणपणे गरोदरपणाच्या पाचव्या ते सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचे की स्पाइन क्लिनिकचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधन संचालक डॉ.गौतम शेट्टी यांनी सांगितले.

यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणे
शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो.

पोट आणि कुल्ह्यांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो.

ज्यांची जीवनशैली कृतीशील आहे त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची शक्यता अधिक असते

ज्या स्त्रियांना गरोदरपणात शारीरिक कष्टांचे काम करावे लागत असेल, त्यांना या अवस्थेत पाठदुखी होण्याचा संभव असतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारची अतिरेकी हालचाल होता कामा नये.

तरूण वय आणि आधी झालेल्या अनेक प्रसूती हेसुद्धा पाठदुखीसाठीचे प्रमाण वाढण्यासाठीचे कारण आहे. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने मातेच्या आरोग्यावर परिणाम होतो

तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीपश्चात होणारी पाठदुखी, मग ती वारंवार उद्भवणारी असो की सतत होणारी असो, तिचा संबंध गरोदरपणातील लक्षणांशी असतो. यापैकी बहुतेक प्रकारची पाठदुखी प्रसूतीनंतर ६ महिन्यांच्या काळात निघून जाते, पण काही प्रकारची पाठदुखी ही जास्त काळासाठीसुद्धा राहू शकते.

गरोदरपणात पाठदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या काही टिप्स
१. बसताना, उभे राहताना, चालताना अथवा झोपताना सुयोग्य शारीरिक स्थिती ठेवणे हे पाठीच्या खालच्या भागातील दुखणे उद्भवू नये यासाठी गरजेचे असते.


२. खूप काळ बसलेल्या स्थितीत राहू नका, कारण यामुळे तुमच्या कण्यावर अतिरिक्त भार येतो


३. बसताना पाठीच्या मागे उशी ठेवा, जेणेकरून तुमच्या पाठीला आधार मिळू शकेल.


४. गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आणि सल्ल्यानुसार पाठीचे आणि ओटीपोटाचे व्यायाम करावेत, जेणेकरून हे स्नायू सशक्त होतील, तुमच्या शरीराचा बांधा सुयोग्य राखतील आणि तुमच्या दैनंदिन क्रिया तुम्हाला सामान्यपणे करता येतील.


५. गुडघे पोटाजवळ घेणे (नी पुल), झोपलेल्या अवस्थेत पाय सरळ करून तो वरच्या बाजूला उचलणे (स्ट्रेट लेग रेझिंग), झोपलेल्या अवस्थेत वरच्या मान वरच्या बाजूकडे आणणे (कर्ल अप), एका कुशीवर झोपून पाय वरच्या बाजूला उचलणे (लॅटरल स्ट्रेट लेग रेझिंग) आणि केगल व्यायमप्रकार अशा प्रकारचे व्यायाम करावेत, जेणेकरून गरोदर महिलांना पाठदुखीपासून आराम मिळू शकेल.

संदर्भ: Zeenews

लेखक : anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita