३/१५/२०१५

‘मावळे’ ह्या शब्दाची निर्मिती !उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या ह्या सह्याद्री रांगांतून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या लहान लहान पर्वतांच्या रांगा आहेत. दोन दोन रांगांच्या मधून असणाऱ्या अशा जमिनी,खेडी आणि लहान लहान नद्या यांना खोरी म्हणत. अशी खोरी उत्तरेकडील जुन्नरपासून दक्षिणेकडील महाबळेश्वरपर्यंत पसरली आहेत.बऱ्याच खोऱ्यांची नावे त्यातील वाहणाऱ्या नद्यांच्या नावावरून पडली आहेत. ही खोरी पश्चिमेकडे असल्यामुळे त्याला मावळती हा शब्द वापरत (त्या दिशेला सूर्य अस्ताला जातो.) त्यामुळे अनेकजण ह्या भूप्रदेशाला ‘मावळ’ म्हणू लागले ; आणि येथील राहणाऱ्या लोकांना ‘मावळे’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

संदर्भ - इतिहासकार सेतू माधव पगडी यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ ह्या ग्रंथामधून.
संदर्भ: छत्रपती शिवाजी
लेखक :सेतू माधव पगडी


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search