३/१८/२०१५

'टोचणी’


नमस्कार,

पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही सगळ्यांनी मिळून मी मराठी माझी मराठी ला आपलसं केलत.
मला सांगायला खूप आनंद होतोय, कि आपली हि साईट पहिल्यांदा शुरू करण्यात आली होती ती गम्मत म्हणून ,पण तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाच्या जोरावर आम्हाला कळलंकि अजूनही मराठीत नवीन लेखक तयार आहेत भविष्यात मराठी साहित्य आणखीन समृद्ध करायला. आणि म्हणूनच आम्ही आता हि साईट, एक साईट न ठेवता ती अजून व्यापक दृष्टीने कशी बनवता येईल याचा विचार करायला सुरुवात केली आहे. जेणे करून तुमच्या लेखांना आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि अधिकाधिक वाचक हे निर्माण होतील.
आणि हाच हेतू डोळ्या समोर ठेवून आता आपण ह्या गुढी पाडव्या पासून आपल्या साईट वर नवीन विभाग तयार करत आहोत ज्याचं नाव आहे टोचणी .
आज वर तुमचे लेख हे खूप मजेशीर होते आणि आहेतच. पण फक्त चांगले लेख लिहूनच आपली जबाबदारी संपते असं मला वाटत नाही. मुळात लेखक हा उत्तम लेख लिहु शकतो कारण ते त्याला ह्या समाजाकडे बघूनच सुचतं . म्हणून आपण ह्या लोकांच हि काही देण लागतो. आणि तेच तुम्हाला घेऊन करावस वाटतंय... म्हणून हा विभाग तयार केलाय...
नेमक स्वरूप काय असेल ह्या विभागाच ?
              टोचणी हे नावच ह्यासाठी देण्यात आलं आहे, कारण आपल्या आसपास अश्या किती तरी गोष्टी आहेत ज्या घडत असताना , किवा घडल्यावर आपल्याला त्या फार टोचतात. कुठेतरी त्या आपल्याला सलत असतात , ती गोष्टं बघितली किवा एकली कि फार वेदना होतात, कि हे नेमक काय चाललंय आपल्या आजू बाजूला? काही वेळेला अश्या गोष्टी असतात ज्या हल्लीच्या पत्रकारिते मध्ये येतात, पण तरीही काही गोष्टी ह्या आपल्या नजरे समोर घडतात आणि तश्याच बेनामी राहतात.
              ह्याच गोष्टी त्यांच्या पात्रांसह तुम्हाला मांडायच्या आहेत, ह्या आपल्या नव्या विभागात ज्याच नाव आहे टोचणी. ह्या विभागासाठी लिहिताना आधी घडलेल्या गोष्टी ह्या आधी तुम्हाला टोचल्या पाहिजेत आणि तरच त्या तुमच्या लेखणीत उतरतील आणि ते वाचकांपर्यंत पोहचतील.
              हा विभाग आणि ह्या विभागासाठी ठेवलेली अट, ह्या बद्दल तुम्हाला नक्कीच अनेक प्रश्न पडले  असतील. तर त्याच उत्तर एवढच आहे कि तुम्हाला आज त्या गोष्टी ह्या लोकांसमोर त्यांच्या पात्रांसह आणायच्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं कि लोकांना ह्यातून काही बोध घेता येईल...

आशा करतो तुमच्यातला लेखक हा ह्या विभागाला आपल्या लेखणीतून आजून समृद्ध करेल. आणि आपण सगळे ह्या समाजातल्या त्या घटकांना किमान आपल्या लेखणीत तरी न्याय देऊ.
असं म्हणतात कि ह्या त्र्यलोक्यात फक्त एकच सर्वोत्तम लेखक आहे, तो म्हणजे ब्रम्ह देव कारण ते जे काही लिहितात त्याला कोणीही बदलू शकत नाही. आपल्या आस - पास अश्या गोष्टी नक्कीच घडल्या असतील ज्याचा शेवट हा कदाचित चांगला किवा वाईट झालं असेल, चांगला झाला असेल तर उत्तमच पण जर का वाईट घडला असेल तर त्याला तुमच्या लेखणीत चांगला प्रसंग बनवा....
धन्यवाद

टीप :- हा विभाग मर्यादित काळासाठीच आहे.        

अधिक माहिती साठी संपर्क करा
रोहित सुर्वे
99967663630
मी मराठी माझी मराठी
(Review टीम)
ठाणेWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search