नव्या स्मार्टफोनच्या लाँचिगसाठी नवी शक्कल लढविणाऱ्या शाओमीने एका खास सोहळ्यात दोन नवे प्रोडक्ट लाँच केले आहेत. MiPad आणि रेडमी2 स्मार्टफोन यांचे लाँचिग करण्यात आले. रेडमी2 या स्मार्टफोनची किंमत रु. 6,999 आहे. तर MiPad रु. 12,999ला उपलब्ध आहे.
रेडमी2 स्मार्टफोनची विक्री 24 मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र याची बुकींग आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होईल. या फोनची किंमत रेडमी1s एवढीच आहे. हा स्मार्टफोन मोटोe च्या नव्या स्मार्टफोनला चांगलीच टक्कर देईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शाओमी रेडमी 2 स्मार्टफोनचे फिचर्स:
4.7 इंच डिस्प्ले, 1280 x 720 रेझ्युलेशन
64 बिट 1.2 GHz स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर
1 जीबी रॅम आणि 306 GPU
8 जीबी की इंटरनल मेमरी
8 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड किटकॅट 4.4
2200 mAh बॅटरी क्षमता
स्मार्टफोन रेडमी 2 सोबतच शाओमीने MiPad देखील लाँच केला आहे. याची किंमत रु. 12,999 असून तो 24 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
शाओमी MiPadचे फिचर्स:
7.9 इंच डिस्प्ले, 2048x1536 पिक्सल रेझ्युलेशन
2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल मेमरी, 128 जीबी एक्सपॅंडेबल मेमरी
8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
अँड्रॉईड किटकॅट 4.4
6700 mAh बॅटरी क्षमता
संदर्भ:abpmajha
लेखक : anonymous