४/०३/२०१५

स्‍मार्ट विद्यार्थ्यांसाठी पाच बजेट स्मार्टफोनविद्यार्थ्यांसाठी सध्या पुस्तकांशिवाय स्मार्टफोन अभ्यासासाठीचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी नेहमीच मोठ्या स्क्रीनच्या फोनची गरज असते. विद्यार्थ्यांची हीच गरज लक्षात घेऊन आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या अशाच स्मार्टफोनबाबत सांगत आहोत, ज्यांची स्क्रीन मोठी असून किंमत मात्र आवाक्यात आहेत. एक नजर टाकूया या स्मार्टफोनवर


1. लेनोवो A6000
                         

भारतीय बाजारात 4G सेगमेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लेनोवो A6000 आहे. यामध्ये 5 इंचाची एचटी मल्टीटच स्क्रीन देण्यात आली आहे. A6000 मध्ये 1.2 गिगाहर्त्झ क्वॉडकोर प्रोसेसर, 1 GB रॅम, 8 GB इंटर्नल स्टोअरेज आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रिअर आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 3G, एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथची सुविधा फोनमध्ये उपलब्ध आहे.

किंमत: 6,990 रुपये2. मोटो E 2nd जनेरेशनमोटोरोलाने सर्वात लोकप्रिय स्‍मार्टफोन मोटो E चा अपग्रेडेड व्हर्जन नुकताच लॉन्च केला आहे. स्वस्तात मस्त असलेल्या या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ओएस 5.0 लॉलीपॉप आहे. यामध्ये 5 इंचांची आयपीएस डिस्‍प्‍ले आहे. हा 1.2 गिगाहर्त्झ क्वॉडकोर प्रोसेसर, 1 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोअरेजवर काम करतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्‍सेल रिअर आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्‍सेल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 3G, वाय-फाय, ब्लूटूथची सुविधा यात उपलब्ध आहे.

किंमत 6,999 रुपये3. शाओमी रेडमी 2चायनीज अपलच्या नावाने प्रसिद्ध असलेली कंपनी शाओमीने त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन रेडमी 1S चं अपग्रेडेड मॉडेल भारतीय बाजारत लॉन्च केलं आहे. 4 G सपोर्ट आणि 4.7 इंचाच्या डिस्प्ले असलेला हा फोन 31 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हा फोन 1.2 गिगाहर्त्झ क्वॉडकोर प्रोसेसर, 1 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोअरेजवर काम करतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 4.4 किटकॅट ओएस आणि मीयूआयसह काम करतो.

या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेल रिअर आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 3G, एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथची सुविधा यात उपलब्ध आहे.

किंमत 6,999 रुपये4. मायक्रोसॉफ्ट लुमिया 638

                                   
जर तुम्हाला विंडोज फोन हवा असेल तर मायक्रोसॉफ्ट लुमिया 638 हा अतिशय चांगला पर्याय आहे. लुमिया 638 हा फोन 9,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. पण फोनची सध्याची किंमत 6,799 रुपये आहे. लुमिया 638 हा फोन विंडोज 8.1 वर काम करतो. फोनच्या स्क्रीनची साईज 4.5 इंच आहे.

या फोन 1.2 गिगाहर्त्झ क्‍वॉडकोर प्रोसेसर, 1 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोअरेजवर काम करतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. परंतु या फ्रण्ट कॅमेरा मात्र नाही. कनेक्टिव्हिटीसाठी 3G,एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथची सुविधा यात उपलब्ध आहे.

किंमत 6,799 रुपये5. असूस झेनफोन 5असूसने इंटेल प्रोसेसरसह भारतीय बाजारात स्‍मार्टफोन लॉन्‍च केले आहेत. झेनफोन 5 हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय फोनपैकी एक आहे. झेनफोन 5 हा पाच इंच स्‍क्रीन असलेला फोन आहे. यामध्ये अँड्रॉईड 4.3 जेलिबीन ऑपरेटिंग सिस्टम आहे. मात्र कंपनीचा दावा आहे की हा फोन अँड्रॉईड 4.4 किटकॅटवर अपग्रेड केला जाऊ शकतो.

या फोनमध्ये 2 गिगाहर्त्झ ड्यूएल कोर प्रोसेसर, 1 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्‍टोअरेज आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 4.4 किटकॅट ओएस आणि मीयूआयसह काम करतो.

या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेल रिअर आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 3G, एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथची सुविधा यात उपलब्ध आहे.संदर्भ:ABP News
लेखक :anonymousWhatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search