४/२९/२०१५

फेसबुक मेसेंजरवरुन व्हिडिओ कॉलिंग सुरु

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या युजर्सना एक अनोखी भेट दिली आहे. फेसबुकने मेसेंजर अॅप्लिकेशनमध्ये फ्री व्हिडिओ कॉलिंग फीचप लॉन्च केलं आहे. फेसबुक मेसेंजर अॅपच्या या नव्या फीचरला अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम सपोर्ट करु शकतात. त्यामुळे फेसबुक युजर्ससाठी नक्कीच हे मोठं गिफ्ट असणार आहे.जगभरात जवळपास 600 मिलियन फेसबुक मेसेंजर अॅप्लिकेशन युजर्स आहेत. या नव्या फीचर्सचा वापर करण्यासाठी मेसेंजरच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूस व्हिडिओ आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर फ्री व्हिडिओ कॉल करु शकता.फेसबुकच्या या नव्या फीचर्सची स्पर्धा थेट स्काईप, अॅपलच्या फेसटाइम आणि गूगलच्या हँगआऊटशी असणार आहे. या अॅप्लिकेशन्सनी याआधीच व्हिडिओ कॉलिंग सुरु केलं आहे.फेसबुक युजर्स आता मेसेंजर अॅपवरुन आपल्या फ्रेण्डलिस्टमधील मित्रांना व्हिडिओ कॉल करु शकतात. विशेष आयफोनवरील फेसबुक मेसेंजरवरुन अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईलवरही व्हिडिओ कॉलिंग करु शकतात.दरम्यान, अमेरिका, कॅनडा, यूके, फ्रान्ससह अन्य काही देशांमध्ये फेसबुकने व्हिडिओ कॉलिंगचं हे फीचर लॉन्च केलं आहे. लवकरच भारतातील फेसबुक युजर्ससाठी व्हिडिओ कॉलिंग सुरु होणर आहे.


संदर्भ:ABP NEWS

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search