४/११/२०१५

HTC चा तीन कॅमेरावाला स्मार्टफोन लॉन्चतैवानची जगप्रसिद्ध कंपनी एचटीसीने ‘HTC One M9+’ हा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन अखेर लॉन्च केला आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनच्या बाजारात उपलब्ध असला तरी लवकरच जगभारीतल मोबाईलप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे तीन कॅमेरे. अतिशय चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी हे कॅमेरे उत्तम आहेत.कॅमेरा क्वालिटी :HTC One M9+ चा यूएसपी म्हणजे यातील कॅमेरे. रेअर कॅमरा तब्बल 20 मेगापिक्सेल इतक्या क्वालिटीचा आहे. तर फोनच्या वर डेप्थ सेन्सिंगसाठी एफ/2.2 अॅपरचरचा आणखी एक कॅमेरा आहे. त्यामुळे फोटोशूट, सेल्फी आणि व्हिडिओ शूटिंगसाठी अतिशय उत्तम कॅमेरा आहे. ज्यांना सेल्फी काढण्याची आवड आहे त्यांच्यासाठी फ्रंटला अल्ट्रापिक्सेल कॅमेरा दिला आहे. अल्ट्रापिक्सेल ही एचटीसी कंपनीची नवी भेट आहे. मेगापिक्सेकल कॅमेऱ्यांपेक्षा अधिक चांगल्या क्वालिटीचे फोटो अल्टापिक्सेल कॅमेऱ्यातून काढता येणार असल्याचे एचीटीसी कंपनीचे म्हणणे आहे.लेटेस्ट ओएस आणि एचडी डिस्पले स्क्रीनहा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या लेटेस्ट ओएस 5.0 लॉलिपॉपवर काम करतं. HTC One M9+ ला 5.2 इंचाचा एचडी डिस्प्ले स्क्रीन असून त्याला 1440 X 2560 पिक्सेल रिझॉल्युशन असणार आहे. उत्तम स्पीडसाठी 2.2 गीगाहर्ट्झ मीडियाटेक प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी दिली जाणार आहे. यामध्ये 128 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड वापरण्याची सुविधा आहे.साऊंड क्वालिटी आणि 4 जी कनेक्टिव्हिटी


कॅमेरा आणि प्रोसेसिंगसोबतच या एचटीसी स्मार्टफोनमध्ये साऊंट क्वालिटीही दिली आहे. यामध्ये बूम साऊंट क्वालिटी दिली आहे, ज्यामुळे डॉल्बी साऊंडलाही सपोर्ट करु शकतं. स्पीकर्स फोनच्या फ्रंट साईडला लावले आहेत. 3 जी आणि 4 जी नेटवर्क असणाऱ्या या स्मार्टफोनला फिंगरप्रिंट सेंसरही दिला आहे. यामध्ये 2840 एमएएचची बॅटरी आहे. गनमेटल ग्रे, अम्बर गोल्ड आणि सिल्व्ह गोल्ड या तीन कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन किती रुपयांना असणार आहे, याचा अद्याप खुलासा केलेला नाही.


संदर्भ:ABP news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search