भारतीय मोबाइल कंपनी इंटेक्सने आणखी एक नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. अॅक्वा डिझायर HD हा स्मार्टफोन त्यांनी भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर हा स्मार्टफोन लिस्ट केला आहे. हा स्मार्टफोन रु. 8990 किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन इंटेक्स एक्वा डिझायरचाच अपग्रेड व्हर्जन आहे.
या फोनचा प्रोसेसर फारच उत्कृष्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 1.4 GHz अॅक्टा-कोअर प्रोसेसर आहे. अॅक्टा-कोअर प्रोसेरममध्ये एकाच वेळी 8 मेजर टास्क चालू शकतात. तसेच मीडियाटेक प्रोसेसरसह यात 1 जीबी रॅम देखील आहे. मात्र प्रोसेसरच्या तुलनेने याची रॅम फारच कमी आहे.
इंटेक्स एक्वा डिझायर HDचे खास फिचर्स:
* डिस्प्ले 5 इंच एचडी स्क्रिन, 720x1280 पिक्सल रेझ्युलेशन
* 8 जीबी इंटरनल मेमरी, 32 जीबीपर्यत मेमरी क्षमता
* 10 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 3जी, जीपीआरएस, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी आणि ब्ल्यूटूथ
* 2000 mAh बॅटरी क्षमता