४/२५/२०१५

पावभाजी


कुठून घातला मी घाट ,आज पावभाजीचा 
नाव काढताच तिचे ,कर पावभाजीच आज 
घरात नाही कांदा ,बटाटा ,टमाटा ,कोबी ,गाजर ,ढोबळी ती मिरची 
अन सारे म्हणतात ,कर पावभाजीच आज I 
नसे लसून ,मिरची ,कोथिबिर ,बटाटा आणि पावभाजी मसाला 
अन सारेच म्हणतात ,कर पावभाजीच आज 
मी म्हणाले विसरून जा सगळे मी नाही काढले नाव पावभाजीचे 
नाही जिन्नस घरात जे पावभाजीस लागे ,
सर्व म्हणाले आम्ही ,आम्ही आणतो सारे जिन्नस 
लिस्ट आणि पैसे दे तू आम्हास ,
पण तू कर पावभाजीच आज I 
(इतक्यात किमया झाली ) 
मुलांची लाडकी आत्या अचानक आली , 
तीच म्हणाली ,वाहिनी करू नको काही , 
आपण खाऊ बाहेरच पावभाजी I 
काय सांगू कशे सांगू ,हर्ष किती मज आज जाहला 
खटाटोप तो पावभाजीचा वाचला I 
ताव मारला सर्वांनी पावभाजीवर 
खाऊनी तृप्त किती सर्वेझन 
पुन्हा विषय नाही निघाला तिचा , 
मी सोडला मोठा सुस्कारा I 


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : अनघा कुलकर्णी
kulkarni.anagha26@gmail.com
9967360657

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search