भारतीय मोबाइल कंपनी मायक्रोमॅक्सने आपला युनाईट 2 हा स्मार्टफोन आणखी स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील असणारी ऑपरेटिंग सिस्टम अँड्राईड 4.4 ही आता अपडेट होणार युजर्स अँड्राईड 5.0 लॉलिपॉप सिस्टम मिळणार आहे.मंगळवार 7 एप्रिलपासून याबाबत तुम्हांला एक नोटीफिकेशन येणार आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपडेट केल्यानंतर अँड्राईड 5.0 लॉलिपॉप सिस्टम सुरु होईल. याशिवाय युजर्स मॅन्युइली डाऊनलोड करु शकतात. त्यासाठी फोन सेटिंगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट ऑप्शन निवडायचा आहे. किटकॅट ओएस असलेला हा मायक्रोमॅक्सचा पहिलाच फोन होता. तो आता अपडेट होऊन लॉलिपॉप ओएस होणार आहे.

मोटोरोलाला टक्कर देणाऱ्या या स्मार्टफोनची बाजारात चांगलीच चलती आहे. त्यामुळेच कंपनीने युजर्सला ही आगळीवेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनची किंमत रु. 6,999 आहे.मायक्रोमॅक्स युनाईट 2 स्मार्टफोनचे खास फिचर्स:स्क्रीन 4.7 इंच रिझोल्यूशन 800X480 पिक्सेल1.3GHz चा क्वाडकोअर प्रोसेसररिअर कॅमेरा 5 मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सेलबॅटरी 2000 mAh क्षमताफोन मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा


संदर्भ:ABP News
लेखक :anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita