४/१४/२०१५

मोटो E सेकंड जनरेशन 4G स्मार्टफोन भारतात लॉन्चमोबाईल कंपनी मोटोरोलाने सेकंड जनरेशन स्मार्टफोन मोटो E चा 4G व्हेरिएंट आज भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचा नवा फोन ऑनलाईन रिटेल पार्टनर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या फोनची प्री-बुकिंगही सुरु झाली असून त्याची किंमत 7,999 रुपये आहे.

या फोनची किंमत 3G मॉडेलच्या किंमतीपेक्षा 1000 रुपयांनी जास्त आहे. मोटो E 4G ची ऑनलाईन प्री-बुकिंग 23 एप्रिलपर्यंत सुरु राहणार असून, 28 एप्रिलला ग्राहकांना हा फोन मिळेल.

मोटो E सेकंड जनरेशनचे फीचर्स

डिस्प्ले : या फोनमध्ये 4.5 इंचाची 540x960 पिक्सेल रिझॉल्यूशनची स्क्रीन देण्यात आली आहे. शिवायत यामध्ये गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनही दिलं आहे.

ऑपरेटिंग सिस्टम : 5.0 लॉलीपॉप

प्रोसेसर : 1.2 GHZ स्नॅपड्रॅगन 410 क्वॉडकोर

रॅम : 1 GB

स्टोअरेज : 8 GB इंटरनल स्टोअरेज आणि 32 GB पर्यंत एक्सांडेबल

कॅमेरा : 0.3 मेगापिक्सेल व्हीजीए फ्रण्ट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

बॅटरी : 2390 mAh

संदर्भ: ABP News
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search