नेट न्युट्रॅलिटीचा प्रश्न दिवसेंदिवस जास्तच जटील होत आहे. कारण की, आता दूरसंचार कंपन्यांनी इंटरनेट डेटा प्लान 6 पटीने महाग करण्याचा इशारा दिला आहे. दूरसंचार कंपन्यांच्या मते, त्यांना नेट आधारित सेवांसह समान सुविधा न मिळणं ही व्यावहारिकदृष्ट्या चुकीची गोष्ट आहे. यामुळेच इंटरनेट डेटा प्लान 6 पटीने वाढविणं भाग आहे.
दुसरीकडे, नेट न्यूट्रलिटीच्या समर्थनार्थ चेन्नई आणि बंगळुरुमध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी निदर्शने केली. तर मोबाइल कंपन्यांनीही इंटरनेट निष्पक्षतेचे समर्थन केले आहे. या संदर्भातच दूरसंचार विभागाने 27 एप्रिलला एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
ज्या एक अब्ज लोकांपर्यंत इंटरनेट पोहचलेले नाही त्यांच्यापर्यंत इंटरनेट पोहचविण्याचा चंग कंपन्यांनी केला आहे. यासाठीच त्यांनी ‘सबका इंटरनेट, सबका विकास’ हा नवा मंच सुरु केला आहे. याच अतंर्गत इंटरनेटच्या विस्तारासाठी देखील गुंतवणूक करण्यात येणार होती. मात्र नेट न्यूट्रलिटीच्या वादानंतर आता दूरसंचार कंपन्या या संभ्रमात पडल्या आहेत.
संदर्भ: ABP News
लेखक :anonymous
छायाचित्रे:Internet
छायाचित्रे:Internet