स्मार्टफोन हल्ली प्रत्येकाची गरज बनली आहे. विशेषत: तरुण वर्गाची. काही वेळासाठी जरी स्मार्टफोन दूर राहिला तरी जीव कासाविस होतो, असे कित्येक जण आपल्या आजूबाजूला असतात. समजा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला तर? हा विचारच नकोसा वाटतो ना? पण आता घाबरण्याची गरज नाही. कारण आता तुमचा स्मार्टफोन हरवला तर शोधण्यासाठी दस्तुरखुद्द गूगल मदत करेल. गूगलने ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.गूगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, तुमचा स्मार्टफोन हरवला तर तुम्ही गूगल मॅपवर तो ट्रॅक करु शकता. शिवाय गूगल तुमच्या स्मार्टफोनवर कॉल करेल आणि त्यामुळे तुमच्या फोनची रिंग वाजेल. ज्यामुळे मोबाईल जवळपास कुठे असेल तर पटकन मिळेल.

यासाठी तुम्हाला गूगल सर्च इंजिनमध्ये जाऊन ‘Find my phone’ टाइप करावं लागेल आणि तुम्ही तुमचा स्मार्टफोन गूगल मॅपवर ट्रॅक करु शकता.जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन कुठे विसरला असाल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर रिंगही वाजवू शकता. त्यासाठी रिंग बटनावर क्लिक केल्यानंतर स्मार्टफोनवर पाच मिनिटांपर्यंत रिंग वाजेल.गूगलच्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये GPS अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. GPS अॅक्टिव्ह असेल तरच तुम्ही तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधू शकता.संदर्भ: ABP News
लेखक :anonymous

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita