मी भरपूर तास सेक्स करु शकतो... असा दावा कुणी करत असेल तर तो खोटं बोलतोय, एवढं नक्की. कारण ' बेस्ट सेक्स ' हा काही मिनिटांचाच असतो, तासांचा नव्हे... असा निष्कर्ष अमेरिका आणि कॅनडातील सेक्स तज्ञांनी संशोधनाअंती काढला आहे.
ज्याला बहुसंख्य लोक ' समाधानकारक ' सेक्स म्हणतात, तो ३ ते फार तर १३ मिनिटांचा असतो, असे पेन स्टेट युर्निवर्सिटीने केलेल्या संशोधनात आढळले आहे. संशोधक एरीक कोर्टी आणि जेने गार्डियांनी यांनी केलेल्या या सेक्स संशोधनाचे निष्कर्ष सेक्शुअल मेडिसीन मासिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. सायकॉलिजिस्ट, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, विवाह आणि कुटुंब कल्याण तज्ञ, नर्सेस, विवाहित कपल्स यांच्याशी बोलून हे संशोधन करण्यात आले आहे.
जवळपास ६० टक्के लोकांनी बेस्ट सेक्सचा काळ हा ३ मिनिटे ते जास्तीत जास्त १३ मिनिटांचा असतो, असे मत व्यक्त केले. सेक्सला सुरुवात केल्यापासून वीर्यपात होईपर्यंतची वेळ त्यात मोजण्यात आली आहे. ३ ते ७ मिनिटांचा सेक्स हा पुरेसा, ७ ते १३ मिनिटांचा इच्छापूर्ती करणारा सेक्स, १ ते २ मिनिटांचा खूपच शॉर्ट सेक्सआणि १० ते ३० मिनिटांचा खूपच लांबलेला सेक्स अशी वर्गवारी संशोधकांनी केली आहे.
सेक्सबाबत अनेक कपल्स अनभिज्ञ असतात. मोठ्या आकाराचे लिंग असेल तर चांगला सेक्स अनुभवता येतो, अगदी रात्ररात्रभर संभोग करायचा असतो, लिंगात कायम ताठरता असेल तरच सेक्सची मजा जास्त येते, असे स्त्री-पुरुषांचे अनेक गैरसमज असतात, असे या संशोधनात आढळले. काही लोकांनी तर अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेक्स करता आला पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली.
संदर्भ: Internet
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous