४/२३/२०१५

ती मला म्हणाली


ती मला म्हणाली

एक प्रश्न सारखा माझ्या मनात

येतो रे
मी : कोणता प्रश्न ??
ती : खरं उत्तर देणार असशील तर
विचारते
मी : काय गं म्हणजे तुला काय
म्हणायचं
मी तुझ्या सोबत खोटे बोलतो
ती : तसे नाही रे पण हा प्रश्न
जरा माझ्यासाठी खास आहे
आणि तु दिलेल छानस उत्तर मला हव
आहे
मी : ठिक आहे विचार मग
ती : तु खूप मस्त आहेस तुझं बोलणं तुझं
वागणं
माझ्यावर भरभरून प्रेम करणं मी तर
खूप
साधी आहे रे
अगदी तुझ्या समोर काहीच नाही
मग तु माझ्यात असे काय बघून
माझ्यावर प्रेम
केलस ??
मी : एक तिला गोड स्माईल दिले
आणि म्हणालो
तुझ्या दिसण्यावर
तुझ्या हसण्यावर
तुझ्या गालावर
तुझ्या गुलाबी ओठावर
तुझ्या पानेदार डोळ्यावर
तुझ्या रेखीव नाकावर
तुझ्या लांबसडक केसांवर
तुझ्या हणूवटी वरील खळीवर
तुझ्या मुखातून येणार्या मधुर शब्दावर
तुझ्या हरणी सारख्या चालेवर
तुझ्या आकर्षीत करणार्या आदानवर
तुझ्या चेहर्यावरील हावभावानवर
खरंच सांगायचं तर या तुझ्या कशावरच
मी प्रेम
केलं नाही
सौंदर्य हे चिरकाळ टिकत
नाही म्हातार पण
आलं कि सर्व
विदरूप होतं सौंदर्य आहे
तेव्हा तो पर्यंत प्रेम
करणार्यातला मी नाही
आणि म्हणून मी फक्त तुझ्या छातीत
माझ्यासाठी धडधडणार्या त्या तुझ्या ह्रदयावर
प्रेम केलं आहे ते ना काळे ना गोरे
ना सुंदर
ना विदरूप
ते माझ्यासाठी जिवास जिव
देणारं
आहे
माझ्या भावनाना समजून घेणारं आहे
माझ्या प्रेमाला हळूवार जपणारं आहे
हो मी प्रेम केलंय तुझ्या स्वभावावर
तुझ्या वागण्यावर तुझ्यात
असलेल्या माझ्यावर फक्त
तुझ्या ह्रदयावर
आणि म्हणूनच सौंदर्य संपेल पण माझं
प्रेम
कधीच संपनार नाही
माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातुन
अश्रू
वाहात होते
मी तिला जवळ घेतले
अश्रूंचा ओघ कमी झाल्यावर ती फक्त
इतकेच
म्हणाली
मी या जगातील सर्वात नशिबवान
मुलगी आहे.............


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search