४/२५/२०१५

फिल्म रिव्ह्यू : आटली बाटली फुटलीआज बॉलिवूडसाठी हा आठवडा नॉट सो स्पेशल असणार आहे, असं काहीसं चित्र दिसून येतंय. अनेक सिनेमे आपल्या भेटीला येत असले तरी हे सगळेच सिनेमे वेगळया जॉनरचे लो बजट, प्रमोट न केलेले आणि फार मोठे चेहरे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार नाहीत.

हो पण याचा अर्थ असा नाही की हे सगळेच सिनेमे वाइट आहेत. विनय पाठक, मुगधा गोडसे स्टारर काजझ के फुल्स, नवाझुद्दीन सिद्धिकी स्टारर लतीफ, ओम पुरी अन्नु कपूर, सतिश कौशिक अशी तगडी स्टारकास्ट असलेला जय हो डेमोक्रसी, हे सिनेमे ओज बॉक्स ओफिसवर आपलं नशीब आजमावणार आहे.

याच बरोबर मराठीत सिनेजगतात जितेंद्र जोशी संजय मोने स्टारर म्हैस आणि बच्चेकंपनीसाठी आटली बाटली फुटली हे सिनेमे प्रदर्शित झालेत तर हॉलिवूडचा अवेंजर्स हा बहुचर्चीत बिगबजट सिनेमा ही आफल्या भेटीला आलाय.. तेव्हा आपण सुरुवात करणार आहोत मराठी सिनेमापासून... पण त्याआधी आज प्रदर्शित होणा-या या सगळ्याच सिनेमांवर एक नजर टाकुया..

कथा

अमोल पाडावे दिग्दर्शित आटली बाटली फुटली या सिनेमाच्या नावावरुन तुम्हाला कळलं असेलच की लहान चिमुर्ड्यांची ही गोष्ट आहे.. या मुलांची एकमेकांशी खुप छान मैत्री असते. हे सगळे एकाच कॉलॉनीत राहत असतात.. याच सोसायटीत एक नवं कुटुंब रहायला येतं.. या कुटुंबातल्या आशा नावाच्या छोट्या मुलीशी या बच्चेकंपनीची मैत्री होते.. तिच्या आई वडिलांचा अपघाची मृत्यू झाल्यामुळे ती तिच्या मामा मामीसोबत राहत असते. कायम शाळेत पहिला नंबर पटकवणारी आशा, मामा मामीच्या अत्याचारामुळे् एकटी पडते, ते तिला शाळेतही पाठवत नाही.. असं काहीसं नाट्य या सिनेमात रेखटण्यात आले.

या सिनेमातल्या सर्वच बच्चेकंपनीनं छान काम केलंय. एक बरा सिनेमा आहे जो कदाचित या वेकेशनच्या काळात चालू शकतो. सिनेमा लो बजट असल्यामुळे त्याचं योग्य प्रमोशन करता आलं नाहीये.. पण overall पाहता आटली बाटली फुटली हा सिनेमा लहान मुलांसाठी या वॅकेळनमध्ये एक अन टाइम वॉच ठरु शकतो.


संदर्भ: Zee News
लेखक :anonymous
छायाचित्रे:Internet

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search