४/०६/२०१५

जिओनीनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन Elife S7


हैदराबादमध्ये चायनीज कंपनी जिओनीनं आपला सर्वात स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन Elife S7 काल एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन केवळ ५.५mm जाडीचा आहे. फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. जो एका आठवड्याच्या आत व्हाइट, ब्लॅक आणि निळ्या रंगासोबत बाजारात उपलब्ध असेल. हा फोन जिओनीनं मार्चमध्ये झालेल्या MWC2015मध्ये लॉन्च केला होता.

जिओनी ईलाइफ s7मध्ये ५.२ इंचाची स्क्रीन आहे. रिझॉल्यूशन 1080X1920 आहे. अल्ट्रा स्लिम फोन
असल्यानं हा फोन दिसायला खूप पातळ आणि शानदार आहे.

जिओनी ईलाइफ s7मध्ये आपल्या स्वत:चा Amigo 3.0 युजर इंटरफेस दिलाय. फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचं लेटेस्ट व्हर्जन (अँड्रॉइड लॉलीपॉप ५.०) आहे. नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये दमदार डिझाइन आहे. प्रोसेसर १.७ GHz ऑक्टा-कोर आहे, जे मल्टिटास्किंग असेल. या फोनची सर्वात महत्त्वाची आणि खास बाब म्हणजे फोनचा नोटिफिकेशन बार.

सामान्यपणे सर्व फोनमध्ये वर नोटिफिकेशन बार असतो. पण या फोनमध्ये खालच्या बाजूने वर स्लाइड केलं की नोटिफिकेशन बार मिळेल.

नव्या सॉफ्टवेअरमध्ये मटेरिअल डिझाइनच्या कारणानं या फोनमध्ये चांगलं अॅनिमेशन आणि ग्राफिक्स दिसतं. एवढंच नव्हे तर या इव्हेंटवर जिओनीच्या ईलाइट s8ची पहिली झलक दाखवली गेलीय. जो की लवकरच लॉन्च होईल.

१३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि सोनी लेंस जिओनीच्या या फोनमध्ये जबरदस्त फोटो क्वॉलिटी आहे. सोबतच कमी लाइट असतांनाही फोटो क्वॉलिटी चांगली येण्यासाठी LED फ्लॅश दिला गेलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला गेलाय.संदर्भ:Zee news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search