४/०२/२०१५

'क्रोमबिट',ने टीव्हीला बनवा कंप्युटर'गुगल' आणि तैवानी कंपनी 'आसुस'ने 'क्रोमबिट' हे आपलं नवं डिव्हाईस लवकरच लाँच करणार आहे. हे डिव्हाइस टिव्हीच्या पोर्टला जोडल्यास यातील ऑपरेटींग सिस्टिमद्वारे तुम्ही टिव्हीचा (कोणत्याही डिस्प्लेचा) कंप्युटर म्हणूनही वापर करु शकता.

पेनड्राईव्ह प्रमाणेच ‘कोमब्रिट’ हे आकाराने लहान असणारं डिव्हाइस असून कुठेही घेऊन जाणं सहज शक्य आहे.

टॅबलेट किंवा लॅपटॉप यासारख्या गोष्टी बऱ्याचदा सोबत नेताना त्याची फार काळजी घ्यावी लागते. मात्र, हे डिव्हाईस कुठेही सहज नेता येणार आहे. या डिव्हाईसच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही डिस्प्लेचा कंप्युटर म्हणून वापर करु शकता. याचा वापर शाळेत किंवा बिझनेससाठी होऊ शकतो.

आसुस क्रोमबिटचे फिचर्स

* प्रोसेसर रॉकशिप 3288
* रॅम 2 जीबी
* स्टोरेज 16 जीबी
* जीपीयू एआरएम 760 क्वॉड कोअर
* कनेक्टिव्हिटी ब्ल्यूटूथ 4.0, यूएसबी 2.0, 802.11ac आणि 5GHz

असा करा याचा वापर

* बिल्ट इन एचडीएमआय पोर्ट डिस्प्लेला जोडा
* इंटीग्रेटेड यूएसबी पोर्ट किंवा ब्ल्यूटूथने किबोर्ड किंवा माउसच्या साह्याने जोडा

किंमत

* गुगलच्या या छोट्या कंप्युटरची बाजारातील किंमत 100 डॉलर एवढी किंमत असू शकते. म्हणजे भारतीय चलनानुसार रु. 6300 एवढी याची किंमत असू शकते.संदर्भ: ABP news
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search