४/१३/२०१५

सेक्सचा आनंद कसा घ्याल?आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे. आज लिव्ह अॅन्ड रिलेशनशीपला महत्व दिले जात आहे. एकंदर काय आपण कसे जगावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सेक्सला खूप महत्वाचे स्थान आहे. लैंगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहजे. तरच आपला वैवाहिक जीवन आणि आनंद टिकून राहतो. अन्यथा जीवनात कटकटी निर्माण होतात. त्यासाठी काही नियम पाळले तर आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.


सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर काय कराल?


तुम्हा सेक्सचा आनंद घेताना काही नियम स्वत:हून घातले पाहिजेत. सेक्स करताना अधिक आक्रमक होऊ नका, किंवा आपल्या जोडीदारावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका.


सेक्स करण्यापूर्वी जोडीदारासोबत मोकळेपणाने बोला. जोडीदारच्या किंवा तिच्या प्राथमिकता समजून घेवून आपल्या इच्छा थोपवू नका. जोडीदारासोबत सहज व्यवहार करण्यासोबत आवडी-निवडीही लक्षात घ्यातल्या पाहिजेत. तर लैंगिक जीवन सुखकारक आणि आनंदमय होण्यास मदत होते.


सेक्सची कोणतीही क्रिया करताना जोडीदाराची इच्छा आणि अनिच्छेचा पूर्ण सन्मान करा. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.


शारीरिक समाधानासाठी जोडीदार नाराज किंवा तणाग्रस्त होईल, असे काहीही करू नका. सेक्सचे सुख हे दोन पायांदरम्यान नसून दोन कानांच्या मध्यात अर्थात मस्तिष्कात असते, हे लक्षात घेतले पाहिजे.


जेवण आणि सेक्स दरम्यान कमीतकमी दोन तासांचे अंतर असायला पाहिजे. तसेच सेक्स सहवासाअगोदर हलके आणि पचण्यास सहज जेवण करा.


काहीवेळा यौनच्छा कमी होणे, शारीरिक थकावट, चिडचिड होऊ शकते. यामुळे जोडीदाराची समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न करा. कारण महिलांमध्ये मॅनोपॉज (रजोनिवृ‍त्ती) प्रमाणेच पुरूषांमध्येही ४५ वर्षानंतर एंड्रोपॉज येते.


तुम्ही एकदा सेक्स केला तर खूप ऊर्जा खर्च होते. एका मैदानात तुम्ही चारवेळा फेऱ्या मारू शकता, इतकी ऊर्जा खर्च होते. म्हणूनच सेक्समुळे शारीरिक सुख तर मिळतेच, सोबतच व्यायामही होतो.संदर्भ:Zee news
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search