४/१६/२०१५

IPL चे पाकिस्तानीकरण .... (टोचणी)

mumbai indians vs rajasthan चा सामना १४ एप्रिल ला सरदार पटेल stadium मध्ये झाला, अहमदनगर नगर मधल हे stadium! सामना rajasthan ने जिंकला खरा पण रोज होणार्या सामन्यान मध्ये IPL teams एवजी पाकिस्तान जिंकत आहे अस वाटायला लागलय आता!!!

अहमदनगर शहराच  नाव आल कि महात्मा गांधी च स्मरण आल्यावाचून राहत नाही आणि IPL च्या याच सामन्या  दरम्यान महात्मा गांधी यांच्या बद्दल ची एक छोटीशी चित्रफित दाखवण्यात आली आणि भारत मातेच्या सुदैवाने त्या वेळी नवज्योत सिंग सिद्धू आणि रमीझ राजा (पाकिस्तानी पूर्व खेळाडू ) होते, त्या वेळेस सिद्धू जींनी महात्मा गांधीना राष्ट्रपिता म्हणून संबोधले आणि धर्म शब्दाचा उपयोग केला तसा सिद्धू सारखा दिलेर माणूस सध्या तरी भारताच्या क्रिकेट विश्वात कोणी नसावा अस मला आता वाटायला लागलाय.पाकिस्तान खेळाडूसमोर आपल्या राष्ट्पित्याचा  गौरव हे काम सिद्धू सोडून कोणालाही जमणार नाही. मी तर म्हणीन भारताची लाज राखली त्याने.


 रमीझ राजा आणि शोऐब अख्तर  (पाकिस्तानी पूर्व खेळाडू ) रोज आमच्या पाकिस्तान संघात अस असायचं, आमचा पाकिस्तान संघ अस करतो,आमच्या संघात सगळे यष्टी-रक्षक कराची मधून असायचे (मुंबई वर २६/११ हल्ला करणारे पण कराची मधून आलेले)  अस प्रत्तेक सामन्यात ऐकून  मीही कंटाळलोय, अजून किती दिवस पाकिस्तान खेळाडू आणि पाकिस्तान संघ यांच्या थापा आम्हा भारतीयांना ऐकाव्या लागतील काय माहित.

IPL च्या  quality control  विभागाने जरा त्याची नोंद घ्यावी.                                                                                                                                                                               

संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :मयूर पाटील
mail.mayurpatil@gmail.com
छायाचित्रे:anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search