आयुष्याचा खेळ सारा,
जीवनामध्ये वाजलेत बारा..
मोडकी नाव दुर किनारा,
पण होऊ नको तु तुटका तारा..!!
बघतोय तुला आसमंत सारा,
लपु नकोस तु आपल्या घरा..
अरे वाजुदे आयुष्याचे तीनतेरा,
पण होऊ नको तु तुटका तारा..!!
डगमगती नाव तु सावर जरा,
दुःखाचा डोंगर तु पोखर जरा..
संकटातली नौका तु वल्हव जरा,
पण होऊ नको तु तुटका तारा..!!
आत्मविश्वास कर तु बळकट जरा,
चिकाटी, जिद्द तु साठव जरा..
रागावर ताबा तु ठेव जरा,
पण होऊ नको तु तुटका तारा..!!
विवेकानंदांना तु आठव जरा,
विचार मनात तु साठव जरा..
अरे तुच आकाश तुच धरती,
पण होऊ नको तु तुटका तारा..!!
लक्षात ठेव तु एकच नारा,
जिंकायचंय तुला जग सारा..
हरलास कितीदा प्रयत्न करा,
भविष्याचा तुच चमकता तारा...!!!
प्रेमवेडा राजकुमार
संदर्भ:मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :धनराज प्रकाश होवाळ
पत्ता: कुंडल ता. पलुस जि. सांगली
मो: 9970679949
dhanrajhowal@gmail.com