४/२५/२०१५

व्यथा


माझ्या व्यथांच्या लक्तरांचे बांधले महाल मी
आसवांच्या हिंदोळ्यावर ढेपाळले जीवन मी
एकेक ऋतूला पाचारले कितिदा तरी
नाहीच बहरलो वसंतात एकदा तरी मी
दू:ख हे माझ्या पाचविला पूजलेले
जहर हे प्राशून तरीही राहिलो जिवंत मी
या व्यथांनो कितीदा तरी मला त्रासण्याला
एकेक दू:ख पचवित ऊरून राहिलो मी
कितीही काढा वाभाडे माझ्या या व्यथांचे
भ्याडपणांच्या हल्ल्याने ना कधी हरणार मी









संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :श्री.प्रकाश साळवी 
prakash.salvi1@gmail.com
9158256054

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search