या फुलांचे गंध घे तू
तू गंधाने न्हाऊन जा
घे बालकांचे हास्य तू
हास्यात तू हरवून जा
होऊन फूलांची बाग तू
सडे आनंदाचे शिंपीत जा
रंग घे तू फुलपाखरांचे
विश्वास तू रंगवून जा
पंख लेऊन पाखरांचे
या नभांती विहरून जा
घेऊन साथ तू चांदण्याची
शांत शितल होऊन जा
मंद स्मित हास्यातून
संदेश शितलतेचा देत जा
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :श्री.प्रकाश साळवी
छायाचित्रे:Tumbler.com
छायाचित्रे:Tumbler.com