नाही हो लाभत कुणालाही
भाग्य प्रेमात पडण्याचे
त्या मधुर क्षणात
बेधुंद होऊन जगण्याचे
नाही गवसत कुणालाही
ते थवे चांदण्यांचे
भाग्यात असावे लागते
हे जगणे प्रीतीचे
अनमोल असते प्रीत
वाटे नाते युगायुगाचे
मिलन घडो वा विरह
मर्म कळते जीवनाचे
भेटली ज्यास प्रीत
जगणे बदलते आयुष्याचे
नशिबात असावे लागते
हे नाते प्रेमाचे
संदर्भ: Facebook share
लेखक:संजय एम निकुंभ
छायाचित्र:Tumblr.com