४/१९/२०१५

देई देवराया


देई देवराया 
असे एक बटन
देहाचा हा प्रवास 
ज्याने जाईल थांबून 
पटकन खटकन 
सारे शांत होवुन
खटपटी वाचून 
दरवाजा मिटेन...

जसा कार्यक्रम संपल्यावर 
बाबा बंद करीत ट्रान्झीस्टर 
निजत असू आम्ही भावंडे 
चादर ओढून डोईवर 
अन मग क्षणात 
तो आवाज बंद होवून 
मागे उरत असे 
एक सुन्न शांतपण 
जगण्यावर अन
त्या दिवसावर 
पडे अलगद
एक पडदा घरंगळून...

ज्याला हवा त्याला दे 
जेव्हा हवा तेव्हा दे
आनंदाने मागणाऱ्याला 
सर्वात आधी दे 
आणि अर्थातच 
प्रथमत: 
माझे बुकिंग घे संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search