४/०७/२०१५

संसाराची गाडी.....


इवल्याशा हाताने सजविते रे,
संसाराची गाडी ।।

चार दगडांच्या भिंती मंधी,
लपली तुझी माझी कहानी ।।
होवुन गेले रुसवे फुगवे,
क्षण सुख-दुखःचे केले साजरे ।।
दगड गोट्याच्या वाटेवरती,
साथ तुझी मखमली ।।
तुझ्या प्रेमानेच तर फुलवली,
ही बाग सारी ।।
संयम सोशिकतेच्या,
रंगवल्या भिंती ।
तुझ्या सुखामध्येच,
माझे सुख दडती...।।
साता जन्माचे नाते कोरले,
चार दगडांच्या भिंती मंधी ।
ऊजळुन गेल्या भिंती सा-या,
झाली आज दिवाळी...।।
इवल्याशा हाताने सजवीली रे,
संसाराची गाडी......


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search