भामटे हे जग सारे
का मला असे वाटते !!
जगण्याचा गंध सारा
उकिरड्या परी साचतो
प्रेमावर नाही भरवसा
विश्वास तरी ठेऊ कसा
याच गोंधळी जिव वेडा पिसा !!
का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!
कुठे हरवला शिवशाहीचा वारसा
याच डोळा याच देही तुकोबांचा
विचार बोलताना दिसत नाही कसा
ओसाड उजाड या जगण्याचा
आज वाटतो भार सारा
आज नाही राहीला जिवना मागे सार
म्हणून मरूण का त्कारू हार !!
का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!
पिसाळलेल्या या जगाचा
कोण करील उध्दार रे
सांगा कोणी मिळेल का ?
पुन्हा या जगाला बुध्द
वा मानवतेची मिसाल तो
शिवबा परी राजा !!
का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!
संदर्भ: facebook share
लेखक :महेश सावंत
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous