४/१८/२०१५

समिकरणे आयुष्याची !


तशी आपल्या आयुष्याची समीकरणे आपण  साधी सोपी ठेऊ शकतो 

 पण काळाच्या ओघात ती आणखी किचकट होऊन  जातात 

कारण आपल्याला हव्या असतात 'वेगवेगळ्या पद्धती ' ती समीकरणे सोडवण्याच्या 

आणखी सोपी,दुसरी एखादी,पेलवणारी वगैरे वगैरे 

'दुसर्यांच्या नियमांनी ' आपण आपली समीकरणे सोडवू बघतो 

कधी गृहीतके चुकतात  तर कधी आकडेमोड 

पण खरे दुख तेव्हा नव्याने बोचते जेव्हा जेव्हा उत्तरेच चुकतात 

मग मनच आपल्याला समजावत , बाबारे तू फक्त चालत राहा ,

गंतव्य स्थानी पोहोचवलच पाहिजे असे रस्त्यावर बंधन लादलेले नाही, तसेच 

समीकरण बरोबरच  आले पाहिजे असे समीकरणावरही !


संदर्भ: facebook share
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search