माझ्यासाठी पाऊस हा ऋतू कधीच नसतो
तुझ्या रूपाने बारमाही कोसळत असतो
क्षणा क्षणाला माझ्या मनाला तो भिजवत असतो
तुझ्या प्रेमाचा पाऊस काळजावर नित्य बरसत असतो
बेधुंद होऊन माझे जगणे मी जगत असतो
ओठांवर प्रेमगाणे लेऊन मी गात असतो
तुझ्या प्रेमाचा गंध मनात दरवळतो
तुला पावसाच्या रूपाने नित्य न्याहाळत असतो
तू कधी कोसळतेस थेंबा थेंबातून
तर कधी बरसतेस मुसळधार धारेतून
लपेटून घेते माझ्या मनाला तुझ्या स्पर्शाने
तरी तुझ्या स्पर्शासाठी मी तहानलेला असतो
मन नेहमी हिरवे हिरवे राही तुझ्या रूपाने
इतके कसे झपाटले प्रिये तुझ्या प्रेमाने
प्रत्येक क्षणी तुला माझ्या हृदयात मी पाहतो
तू पाऊस होऊन बरसतेस मी तुझा होऊन जगतो
संदर्भ: facebook share
लेखक :संजय एम निकुंभ
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous