४/०५/२०१५

तू नाही म्हणाली त्याला..वीस वर्ष झाली 
तू नाही म्हणाली त्याला 
पण कालच घडल्यागत 
तो प्रसंग 
उंचावरून दरीत पडल्याचा 
तो अनुभव 
शब्द सुचत नव्हते तेव्हा 
भावना झाल्या होत्या दग्ध 
आणि तो स्पोर्टली घेतल्याचा 
माझा सपशेल नाटकी अभिनय 
आता मला तुझी स्वप्न पडत नाही 
(झोपही नीट लागत नाही 
वाटत वय झालय) 
तुझे सुख दिसते दुरून 
अन माझेही बरे चाललेय 
पण हा दिवस 
अन ही तारीख 
हटकून आठवण आणते 
साऱ्या जगाचे वाढदिवस 
विसरणारा मी 
आत स्मृतीची घंटी वाजते 
जर तरचा हिशोब 
आता मनात उमटत नाही 
डोळ्यात पाणी मन हळवे 
काही काही होत नाही 
पण या तारखेचे अन 
या आठवणीचे काय करायचे 
मला खरच कळत नाही
संदर्भ:मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखक :विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/
छायाचित्रे:anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search