कितीही पोरी पाहील्या
तरी घराकडेच वळतात पाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
शीला ला म्हणावं हाय
चमेलीलीला म्हणावं बाय !
मुन्नी तर ऑलरेडी
बदनामच हाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
बाईंची जिलेबी खाल्ली कि
साखर वाढत जाय !
कॉलेजातल्या पोरींना फक्त
कोलेजातच डिमांड हाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
सोनम कपूर तर
अजून फारच लहान हाय !
सैफच्या तावडीतून करीना
ह्या जन्मी तरी सुटणार नाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
अळणी भाजी झाली
तरी घरी मिठाची सोय हाय
बायकोच्या हातच्या जेवणाची सर्
ताज च्या कॉफीला सुद्धा नाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
कितीही भारी असली पोरगी
तरी तिला मानावी आपली ताय !
असते ती कुणाची तरी मावशी
आत्या,बायको,अन कुणाची तरी माय !
कितीही पोरी पाहील्या
तरी घराकडेच वळतात पाय !
आपलीच बायको असते
आपलीच ऐश्वर्या राय !
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous