मागे वळुन पहात होतो
तुझ्या येण्याच्या दिशेने
तू येशील कधीतरी
ह्याच एका आशेने
दुरवर नजर जात होती
एकांताचिच फ़क्त साथ होती
भोवतालाची झाडे देखील
सावली सोडून जात होती
खुप पाहिली वाट तुझी
मग चलावच लागल
त्या हरवलेल्या रस्त्यावर
स्वताला शोधवच लागल
दिशा समजेनाश्या झाल्या
वाट दिसेनाशी झाली
तरी तुझ्या येण्याची आस
तशीच शिल्लक राहिली
सारकाही बदलल
मी मात्र नाही
प्रेम माझ तुझ्यासाठी
आज ही निरंतर आहे...
आज ही निरंतर आहे...
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous
छायाचित्रे:anonymous
छायाचित्रे:anonymous